सुमारे ३० वर्षा पासुन फरार असलेला आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषनशाखा लोहमार्ग दौंड युनिट व दौड लोहमार्ग पोलीस ठाणे यांना यश

सुमारे ३० वर्षा पासुन फरार असलेला आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषन
शाखा लोहमार्ग दौंड युनिट व दौड लोहमार्ग पोलीस ठाणे यांना यश
पुणे (क्राईम रिपोर्टर सुनिल सांबारे)
दौंड लोहमार्ग पोलीस ठाणे हददीत सन १९९६ मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८ / १९९६, कलम
३९५,३९७,३३६,३४ भा. द. वी मधील आरोपी नामे राजेंद्र शंकर भोसले उर्फ जळका राजा भोसले राहणार राजेगाव
तालुका दौड जि. पुणे हा सुमारे ३० वर्षा पुर्वी त्याच्या साथिदारासह रेल्वेत दरोडा टाकुन फरार झाला होता,
त्यातील इतर साधीदारांना त्यावेळीच पकडण्यात आले होते, परंतु सदर आरोपी हा फरार होता.
सदर आरोपीला पकडण्या बाबत वरीष्ठांचे वारंवार आदेश होत असल्याने सदर आरोपीचा शोध घेणे कामी
स्थानिक गुन्हे शाखा व दौड लोहमार्ग पोलीस ठाणेची टिम ही सदर आरोपीचा तपास करत असताना एका गुप्त
माहीतीदाराने दिलेल्या माहीती वरून सदर आरोपी हा दिनांक ०१/०४/२०२६ रोजी भिगवण भागात डीकसळ
गावात यात्रे करीता येणार असल्याचे समजले असता तात्काळ त्या ठिकाणी सदर टीम आरोपीचा शोध घेणे करीता
यात्रे मध्ये रवाना झाली व सदर आरोपीला अत्यंत चपळाईने व शिताफीने पकडण्यात त्याना यश आले सदर
आरोपीला ताब्यात घेवून दौड लोहमार्ग पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आली, व सदर आरोपीला मा. दौंड रेल्वे
कोर्ट येथे हजर केले व मा. कोर्टाने सदर आरोपीस येरवडा कारागृहात रवाना करण्याचे आदेश केल्याने सदर
आरोपीस येरवडा मध्यावर्ती करागृहात रवाना केले
सदरची कामगीरी माननीय पोलीस अधिक्षक अश्विनी सानप, माननीय अपर पोलीस अधिक्षक रोहीदास
पवार यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर,
सहा पोलीस निरीक्षक हिमालय जोशी, पो.उप.निरीक्षक शरनार्थी, पो.उपनिरीक्षक भोसले, सहा.पो.उप.निरीक्षक
धनंजय वीर पो हवा आनंद वाघमारे, पो. अंमलदार नरेंद्र पवार, पो. अं. बांगर, म्हेत्रे, चव्हान, सावके, हगारे व अजमेर
शेख यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...